बोरघाटातील धोकादायक वळणांना कायमचा रामराम; प्रवास २०–२५ मिनिटांनी जलद
पुणे, विशेष प्रतिनिधी
बहुप्रतिक्षीत असलेला राज्य सरकारचा महत्वाचा मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ ( Mumbai-Pune ‘Missing Link) प्रकल्प अंतिम टप्यात आला असून, तो येत्या मे महिन्याच्या सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील तीव्र वळणं, अपघातप्रवण उतार-चढाव आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. खोपोलीजवळील बोरघाट परिसरात उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प १३.३ किमी लांबीचा पर्यायी मार्ग असून, यात लांब बोगदे आणि उंच केबल-स्टे पूल यांचा समावेश आहे. सध्याच्या मार्गाच्या तुलनेत सुमारे ६ किमी अंतर कमी होणार असून, एकूण खर्च ६,५९५ कोटी रुपये आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अधिक सुरक्षित प्रवास
या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
-
दोन मोठे बोगदे
-
केबल-स्टे पूल
-
भूस्खलन प्रतिबंधक संरचना
-
पावसाळ्यासाठी सक्षम ड्रेनेज व्यवस्था
बोगद्यांमध्ये आधुनिक प्रकाशयोजना, वायुवीजन प्रणाली, CCTV कॅमेरे, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि अग्निसुरक्षा सुविधा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित ठरणार आहे.
एप्रिलमध्ये चाचण्या, मेमध्ये मार्ग खुला
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पाचे बहुतांश नागरी काम अंतिम टप्प्यात आहे.
एप्रिल महिन्यात
-
रस्त्याचे डांबरीकरण
-
सुरक्षारेषा
-
सूचना फलक
-
तांत्रिक चाचण्या
पूर्ण केल्या जातील. पावसाळ्यापूर्वी मार्ग सुरू करण्यावर प्रशासनाचा भर आहे.