- ‘एमपीडीए’अंतर्गत २९३ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
पुणे, शहरातील गुन्हेगारीला पुणे पोलिसांनी एमपीडीए तसेच मोक्का (293 criminals in Pune are in custody, while 370 criminals are in jail according to MOCCA) सारख्या कारवायांनी लगाम लावला आहे. गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कठोर कारवायांचा वापर करून झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) २९३ जणांना स्थानबद्ध करण्यात आले, तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) संशयितांवर अधिक कारवाई करून ३७० गुन्हेगारांना कारागृहात पाठवण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्त म्हणून अमितेशकुमार यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आणि गुन्हेगारांना पहिल्याच आठवड्यात आयुक्तालयात पाचारण करून सज्जड दम दिला. गुन्हेगारांच्या या शाळेनंतर शहरात समाधान व्यक्त केले गेले. गुन्हेगारांना देखील पोलीस आयुक्तांच्या या सज्जड दममुळे घाम फुटला होता. पण, गुन्हा न करणारे गुन्हेगार ते कसले, अशीच म्हणण्याची वेळ पोलीस आणि पुणेकरांवर आली. टोळी युद्धापासून दहशत माजविण्याचे प्रकार या गुंडाकडून शहरात गेल्या दोन वर्षात घडले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी एमपीडीए तसेच मोक्का सारख्या कारवाया करण्यास सुरूवात केली. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंतच्या दोन वर्षांत शहरातील गंभीर आणि संघटित गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. ‘एमपीडीए’ आणि ‘मोक्का’अंतर्गत केलेल्या कारवायांमुळे अनेक गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहेत.
गेल्या वर्षी सर्वाधिक कारवाया ‘एमपीडीए’ अंतर्गत करण्यात आल्या असून, ‘एमपीडीए’ अंतर्गत २०२३ ते २०२५ या कालावधीत तब्बल २९३ जणांवर कारवाई झाली. विशेषतः २०२४ आणि २०२५ या वर्षांत ही संख्या उच्चांकी राहिली आहे. समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना थेट स्थानबद्ध करण्याच्या धोरणामुळे गंभीर गुन्ह्यांतही घट झाली आहे. एमपीडीए हा गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. कुख्यात आणि सराईत गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी या कायद्याचा प्रभावी वापर केला जात आहे.
‘मोक्का’ अंतर्गत संघटित गुन्हेगारीवर घाव
संघटित गुन्हेगारी, खंडणी टोळ्या, सट्टा-जुगार नेटवर्क आणि रायझिंग टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली. यामुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या सध्या कारागृहात आहेत.
कारवाईची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष ‘एमपीडीए’ व ‘मोक्का’ कारवाया आणि ‘मोक्का’ आरोपी
२०२१– ३८- ५६- १५२
२०२२– ४६- ४१- १४९
२०२३– ४८- १०८- ६५२
२०२४– १०३- ४८- ३८०