पुणे, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या (२०१) संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छायाचित्र मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी (Draft voter list released for Baramati; Register claims and activities by February 25 – District Collector Dudi) यांच्या हस्ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही यादी तयार करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून नाव नोंदवता येईल, तर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ सादर करावा, असे डुडी यांनी स्पष्ट केले. प्राप्त दावे-हरकतींवर ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येईल आणि १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले.
Muralidhar Mohol; मोदी–फडणवीसांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास : मुरलीधर मोहोळ
७,७६३ मतदारांची वाढ
बारामती मतदारसंघात ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अंतिम यादीत एकूण मतदारसंख्या ३,८०,६०८ होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत ती ३,८८,३७१ झाली आहे. म्हणजेच ७,७६३ मतदारांची वाढ नोंदवली गेली आहे.
पुरुष मतदार: १,९२,८१९ वरून १,९६,१०२ (वाढ ३,२८३)
महिला मतदार: १,८७,७६५ वरून १,९२,२४५ (वाढ ४,४८०)
तृतीयपंथी मतदार: २४ (बदल नाही)