- भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडून कारवाई
- तीन गुन्ह्यात पाहिजे होता पोलिस हवालदार
पुणे, शहर पोलिस दलात पुर्वी वरिष्ठांचा वसूलीवाला आणि नंतर फसवणूक तसेच आर्थिक गुन्ह्यांमध्ये चर्चेत आलेल्या त्या फरार पोलिस हवालदाराला (He is a fugitive police constable in Andhra Pradesh, the police have put him in handcuffs.) पुणे पोलिसांनी आंध्र प्रदेशातून पकडले आहे. धक्कादायक म्हणजे, फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तीन प्रकरणांमध्ये तो पाहिजे आरोपी आहे.
गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. सांगवी) असे पकडण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्याला आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाठलाग करून पोलिस पथकाने त्याला पुलपथरू गावातून ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी पुण्याकडे आणण्यात येत आहे.
गणेश जगताप याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, कोथरूड पोलिस ठाणे आणि चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर २०२५ पासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सपोनि स्नेहल थोरात, पोहवा मंगेश पवार, पोशि मंगेश गायकवाड आणि मपोशि मणेर यांचे पथक ६ फेब्रुवारी रोजी तेलंगणा व आंध्र प्रदेशात रवाना झाले होते. आरोपी कडप्पा जिल्ह्यातील राजामपेठ तालुक्यातील पुलपथरू गावात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मन्नूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये त्याला औपचारिक अटक करण्यात आली. आरोपीसह पोलिस पथक दुपारी पुण्याकडे रवाना झाले असून त्याला उद्या न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
—चाैकट—
गणेश जगताप याची कारकिर्द सातत्याने वादादित राहिली आहे. काही काळ वरिष्ठ अधिकार्यांच्या मर्जीत राहिल्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकरणात पोलिस दलात अोळखला जाऊ लागला होता. गणेश जगतापनंतर एका कडक शिस्तीचा प्रिय अधिकार्यांच्या आगमनानंतर वादात आला. एका प्रकरणात निलंबित करण्यात आल्यानंतर गणेश जगताप हा तेव्हापासून वादविवादत असल्याचे दिसून आले. आता तीन गुन्ह्यात तो फरार होता.