- बांगलोदशींचा सर्वाधिक समावेश..!
पुणे, पुणे पोलिसांनी गेल्या वर्षांपासून सुरू केलेल्या परदेशी नागरिकांवरील कारवाईनंतर (Pune Police action, 205 people arrested in three and a half years) धक्कादायक वास्तव समोर आले असून, मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक हे पुण्यात बेकायदा वास्तव करत असल्याचे समोर आले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहरातून गेल्या सव्वा तीन वर्षात तब्बल २०५ जणांना पकडले आहे. यामध्ये सर्वाधिक बांगलादेशी महिलांचा समावेश असल्याचेही पोलिसांनी कारवाईतून समोर आले आहे. बेकायदा भारतात घुसखोरी केल्यानंतर ते भारतीय कागदपत्रे तयार करतात, त्या आधारे वास्तव्य करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी नुकतेच बुधवार पेठेत मोठी कारवाई केली. बांगलादेशी मुलींना जबरदस्ती देहविक्रीस भाग पाडले जात असल्याचे समोर आल्यानंतर शहरात बेकायदा वास्तव्य करणार्यांवर जोरदार कारवाईचे आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. त्यानूसार, शहरात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी तसेच इतर परदेशी नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी विविध भागात तपास मोहीम, कागदपत्र पडताळणी आणि गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई अधिक तीव्र केली आहे. मानवी तस्करी व देहविक्रीसारख्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुढील काळात बेकायदा वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कारवाई आणखी कडक केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कारवाईत वाढ
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अवैध स्थलांतरितांविरोधातील कारवाईत लक्षणीय वाढ झाली आहे.
-
२०२३ मध्ये बांगलादेशी नागरिक आढळले नव्हते; मात्र आफ्रिकन देशांतील २ आणि इतर देशांतील १६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती.
-
२०२४ मध्ये १ बांगलादेशी, २५ आफ्रिकन देशांतील आणि ३१ इतर देशांतील नागरिकांना निर्वासित करण्यात आले.
-
२०२५ मध्ये ही संख्या झपाट्याने वाढून ८१ बांगलादेशी, ३ आफ्रिकन देशांतील आणि २० इतर देशांतील नागरिकांवर कारवाई झाली. एकूण १०४ जणांना मायदेशी पाठविण्यात आले.
-
२०२६ मध्ये आतापर्यंत २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रे मिळतातच कशी
बांगलादेशी नागरिकांना पुण्यात वास्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी ते बनावट कागदपत्रे बनवत असल्याचे आढळून आले आहे. तसेच, काही जणांनी पुण्यातील स्थानिकांशी लग्न केल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. बांगालदेशींना आश्रय देणाऱ्या किंवा बनावट कागदपत्रांसाठी मदत करणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत.
वर्षानुसार पकडलेले बांगलादेशी व परदेशी नागरिक
2023– 18
2024– 57
2025– 104
2026– 26