– पुणे काँग्रेसची पोलिस आयुक्तांकडे मागणी
– कायदेशिर नोटीस बजवावून सोडले
– तुषार दामगुडेचे पिस्तूल जप्त
पुणे, प्रतिनिधी : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाण तसेच त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी (Congress demands registration of a case against Hindutva activist Tushar Damgude under the Arms Act) तुषार दामगुडे यांच्यासह साथीदारांवर आर्म अॅक्ट तसेच मारहाणीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटले. यावेळी त्यांनी मारहाणप्रकरणासंदंर्भाने चर्चा केली.
याप्रकरणात दामगुडे सह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांना बीएनएस ३५ (३) ची कायदेशिर नोटीस बजाऊन सोडून देण्यात आले. याबाबत हनुमंत दिगंबर पवार (वय ४१, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषीकेश परदेशी, अभिमन्यू मैड यांच्यावर बीएनएस कलम अनुक्रमे 190 , 191 (2), 115 (2), 351(3), 192 आणि आर्म ॲक्टनुसार दामगुडे यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दामगुडे आणि पवार हे सोमवारी सायंकाळी एका माध्यमाच्या कार्यालयात वार्तालाप कार्यक्रमात सहभागी झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वार्तालाप कार्यक्रम संपल्यानंतर दामगुडे सुरवातील बाहेर पडले. त्या पाठोपाठ पवार हे फोनवर बोलत बाहेर पडले. तेव्हा दामगुडेसह त्यांच्या साथीदारांनी पवार यांना बोलवून घेत तू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतो. तुला हर्षवर्धन सपकाळ यांचा एवढा पुळका का आहे. पुण्यात राहायचे असेल, तर नीट रहा, अशी धमकी दामगुडे यांनी पवार यांना दिली. नंतर दामगुडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून पवार यांना मारहाण केली, असे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला. दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांना स्वारगेट पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन दाखल कलमान्वये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याने दामुगुडेसह साथीदारांना ३५ (३) ची बजाऊन सोडून देण्यात आले. यावेळी दामगुडे यांच्याकडील पिस्तुल आणि परवाना पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस आयुक्तांना काँग्रेसच्या वतीने निवेदन
हिंदुत्वावादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्त अमितषे कुमार यांना याबाबत निवेदन दिले. मागील काही दिवस पुणे शहरातमध्ये जे राजकीय हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत ते अत्यंत निंदणीय आहेत. यामुळे शहराची प्रतिमा त्यामुळे खराब होत आहे. दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी काँग्रेस भवनावर झालेला भाजपाकडून हल्ला झाला. त्यावेळी ५० फुटावर भाजपाला आंदोलनाची परवानगी दिली होती. भाजपा कार्यकर्त्यानी कॉग्रेस भवनावर दगडफेक केली. त्यामध्ये कॉग्रेस कार्यकर्ते, पत्रकार जखमी झाले. तर सोमवारी पवार यांच्यावर हल्ल्याचा प्रकार घडल्याची आठवण निवेदनाद्वारे करून देताना. असे वारंवार प्रकार शहरात घडत असून पोलिसांकडून योग्य प्रकारची कारवाई अपेक्षीत आहे, अशी मागणी आहे.