पुणे, प्रतिनिधी
पहिल्या पत्नीला भेटत असल्याच्या संशयावरून सतत वाद घालणाऱ्या दुसऱ्या पत्नीचा (Suspecting that he was meeting his first wife, he repeatedly argued with her, and his wife killed herself with a blanket.) पतीने खून केल्याची धक्कादायक घटना खडकी परिसरातील चिखलवाडी येथे घडली. पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा ब्लँकेटने नाक आणि तोंड दाबून जीव घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६, रा. चिखलवाडी, खडकी) याला अटक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर बिंदु यांच्याशी विवाह केला होता. दोघेही चिखलवाडी येथे राहत होते. मात्र, दिलीप हे घटस्फोटीत पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा बिंदु यांना संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून निर्माण झालेल्या संतापातून दिलीप यांनी झोपेत असलेल्या पत्नीचा ब्लँकेटने नाक व तोंड दाबून खून केल्याचा आरोप आहे.
आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी दिलीप कंडाथील यांना तात्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.