पुणे, प्रतिनिदी : पुण्यात विविध भागांत दररोज घरफोडीच्या घटना घडत असतानाच याचप्रकरणात पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील एका गँगस्टरला पुण्यातून अटक केली आहे.(Gangster from Uttar Pradesh arrested by Pune Police, read what is the real case) गँगस्टर उत्तर प्रदेशातील कुख्यात ‘सनी गँग’मधील असल्याचेही समोर आले असून, त्याला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यासह साथीदारालाही ताब्यात घेतले असून त्यांनी ६ घरेफोडल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आकाश सुभाष (वय २३, रा. दिल्ली, मुळ मेरठ – उत्तर प्रदेश) आणि जितेंद्र चर्तुवेदी (वय ३२, रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलिस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आले आहेत.आकाश सुभाष हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो कुख्यात ‘सनी गँग’चा सदस्य असल्याचे तपासात उघड झाले आहे. उत्तर प्रदेश पोलिसही त्याचा शोध घेत होते. तो दिल्लीमध्ये राहत असून तेथून पुण्यात येऊन घरफोड्या करत होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
घरफोडी केल्यानंतर दोघेही पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये राहत होते. नंतर रेल्वेने दिल्ली व उत्तर प्रदेशात जात होते. विश्रामबाग पोलिसांना एका गुन्ह्याचा तपास करताना या आरोपींची माहिती मिळाली. सीसीटीव्हीत देखील आरोपी कैद झाले होते. त्यानूसार, त्यांचा माग काढण्यात आला. आरोपी उत्तरप्रदेशात गेले होते. पण, पुन्हा ते पुण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ओंकारेश्वर पुलाजवळून अत्यंत थरराक रित्या पकडले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे तसेच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जुन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर आणि पथकाने केली.एक महिना उत्तर प्रदेशात पोलिसांचा मुक्काम
आरोपी उत्तर प्रदेशात पळाल्याचे समजताच पोलिस अंमलदार *अनिस शेख आणि आशिष खरात* मेरठ येथील नई वस्ती परिसरात वेशांतर करून राहिले. जवळपास *एक महिना तेथील परिसरात राहून आरोपींबाबत माहिती गोळा* करण्यात आली. त्याचदरम्यान आरोपी पुन्हा पुण्यात आल्याची माहिती मिळताच दोन्ही पोलिस तातडीने पुण्यात परतले