– २३ एप्रिलला मतदान, ४ मे रोजी मतमोजणी
पुणे, प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेल्या (Baramati and Rahuri assembly by-elections announced, voting on this day) जिल्ह्यातील बारामती तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी ३० मार्च २०२६ रोजी अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या निधनामुळे रिक्त झाली होती. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न असेल. मात्र आमच्यावर निवडणूक लादली गेल्यास आम्हीही निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अधिसूचना जाहीर : ३० मार्च २०२६ * उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२६ * अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६ * अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ एप्रिल २०२६ * मतदान : २३ एप्रिल २०२६ * मतमोजणी : ४ मे २०२६
————