पुणे, प्रतिनिधी
पुण्यातील वानवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, केवळ कबूतर चोरीच्या संशयावरून पाच जणांनी केलेल्या बेदम माराणीत १९ वर्षीय तरुणाचा जागिच मृत्यू झाला आहे. (19-year-old youth murdered in Pune on suspicion of pigeon theft)या तरुणाचा पाठलागकरून त्याला लाकडी बॉट तसेच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याघटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सलग चौथ्या दिवशी पुण्यात खूनाची घटना घडली आहे.
रूपेश धनराज शिंदे (वय १९, रा. बोराटे वस्ती, मोशी, पिंपरी-चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश व त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय २०, रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) रात्री अडीचच्या सुमारास हडपसर येथून मोशी येथे दुचाकीने जात होते. ते हडपसरमधील शंकरमठ येथून दुचाकीने जात असताना येथील पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोर थांबले. ही सोसायटी कॅनोल लगत आहे. तिथे कबूतर खाना आहे. दरम्यान, थांबल्यानंतर ते येथील एका कबूतराच्या पेटीजवळ गेले. मात्र, अचानक कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे दोघे पळाले. पण, पाच जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. रूपेश शिंदे मात्र, हा पळताना खाली कोसळला. तेव्हा, पाच जणांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच, त्याला लाकडी बॅटने मारहाण केली. या मारहाणीत रूपेशचा मृत्यू झाला.