– बिबवेवाडी येथील प्रकार
पुणे, पुण्यासारख्या अौद्योगिक शहरात स्वत:च दुकान टाकल म्हणून एका तरुणाचा (A young man was murdered in Pune for setting up a shop himself) खून करण्यात आल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. त्यांच्या माहितीवरून खून झालेला तरुण सलूनच्या दुकानात कामास होता. काही दिवस काम केले आणि तो काम देखील शिकला. नंतर मात्र, त्याने मी, गावाला जातो म्हणून काम सोडले आणि याच भागात स्वतःचे सलूनचे दुकान सुरू केले. इतकेच नाही तर, ग्राहक देखील आपल्याकडे बोलवून घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार संबंधित आरोपींना समजला. त्यातून त्यांचे वादविवाद झाले आणि त्यांनी या तरुणाचा खून केला असल्याचे समोर आले आहे.
मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी खुन करणाऱ्या आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक केली आहे.
तक्रारदार मोहम्मद कुरेशी मोहम्मद शमीचा भाऊ आहे. दोघेही मुळचे प्रयागराज येथील आहेत. दरम्यान, आरोपी सौरभ चोरगे याचे बिबवेवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. या दुकानात शमी कामास होता. काही वर्ष त्याने तिथे काम केले. साैरभकडूनच तो काम देखील शिकला. शमी गेल्या दोन वर्षापासून कामाला होता. काही दिवसांपूर्वी शमी याने साैरभला आता मी, गावाला जातो. त्यामुळे काम सोडत असल्याचे सांगितले. पण तो गावाला गेला नाही. त्याने याच भागात स्वतःचे सलूनचे दुकान सुरू केले. इतकच नाही तर त्याने साैरभ चोरगेकडील ग्राहक स्वतःच्या दुकानात बोलवण्यास सुरूवात केली. ही बाब साैरभ चोरगेला समजली. याचा राग मनात धरून तो मित्रांसह शमी याला जाब विचारण्यासाठी त्याच्याकडे गेला. तेथे त्याच्यात वाद झाले. यात तिघांनी शमीला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. यातच शमीचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.