पुणे ; वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (PBA) अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी व चुरशीच्या निवडणुकीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळवला.(Adv. Kaluram Bhujbal elected as President of Pune Bar Association) त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना एकूण ३,८०७ मते मिळाली.
बुधवारी (ता. ४) मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. ५) दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली आणि निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, यंदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी गोंधळ झाल्याची भावना अनेक वकील मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उपाध्यक्षपदाचे निकाल
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत
ॲड. कांताराम नप्ते — ३,६१९ मते
ॲड. प्रतापराव मोरे — २,७०६ मते घेऊन विजयी झाले.
महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३,४७० मते मिळवत विजय संपादन केला.
सचिव, खजिनदार व ऑडिटर पदांचे निकाल
सचिवपदाच्या दोन जागांसाठी
ॲड. सम्राट जांभूळकर — ४,२७२ मते
ॲड. अभिजित पोळ — ३,३४४ मते घेऊन विजयी झाले.
महिला राखीव सचिवपदी ॲड. पूजा पवार यांनी ३,८७६ मते मिळवून विजय मिळवला.
खजिनदारपदासाठी ॲड. अंजली बांदल यांनी ५,२७४ मते मिळवत वर्चस्व राखले.
ऑडिटरपदी
ॲड. शिवराज निंबाळकर — ५,२९० मते तसेच महिला गटातून ॲड. नेहा जांभळे — ४,००४ मते घेऊन विजयी झाल्या.
कार्यकारिणी सदस्य बिनविरोध
कार्यकारिणी सदस्यपदासाठी सर्वसाधारण गटातून
मयूर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रीतेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार, प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शीतल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियांका घाडगे यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली होती.