– २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान परीक्षा
– ‘कॉपीमुक्त अभियान’ची कडक अंमलबजावणी; तणावमुक्तीसाठी समुपदेशन सुविधा
पुणे, प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) (Best Luck; Class 10th exams begin, more than 1.6 million students will appear for the exam) उद्यापासून (शुक्रवारी) सुरू होत आहे. यंदा राज्यभरात १६ लाखहून अधिक विद्यार्थी यंदा परिक्षेसाठी बसलेले आहेत. तसेच, ही परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे, राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांद्वारे परीक्षा पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्या येते. मंडळातर्फे यंदा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधांसोबतच उपाययोजना केल्या आहेत. २३ हजार ६८३ शाळांमधून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तसेच, राज्यभरातील ५ हजार १११ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा एकाचवेळी सुरू राहणार आहे.
राज्यभरातून १६,१५,४८९ विद्यार्थी परीक्षे देणार
– ८,६५,७४० मुले
– ७,४९,७३६ मुली
– १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी
राज्यातील २३,६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ५,१११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
—
‘कॉपीमुक्त अभियान’ची कडक अंमलबजावणी
– परीक्षा पारदर्शक आणि निकोप वातावरणात पार पडावी यासाठी राज्यभरात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे.
– राज्यात २७१ भरारी पथके नियुक्त
– जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत
– परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना
– सीसीटीव्ही असलेल्या केंद्रांवर परीक्षा कॅमेराबद्ध
– गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२ अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा
—
तणावमुक्त परीक्षा; समुपदेशन सुविधा उपलब्ध
विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध असतील.
समुपदेशक संपर्क क्रमांक:
9960644411
7972573742
9834084593
9359978315
8169202214
9371661255
7208429381
7709156068
8421150528
9404783996
—
वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी संधी
वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी २०, २३ व २४ मार्च २०२६ रोजी ‘Out of Turn’ परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत.
—
परीक्षा केंद्रावरील महत्त्वाच्या सूचना
– विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे
– सकाळी १०.३० व दुपारी २.३० वाजता पेपर सुरू
– प्रवेशपत्र शाळांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन उपलब्ध
– उत्तरपत्रिका व प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे
– निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाणार
– दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलती लागू
राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.