काँग्रेसचा आरोप : महापौर, भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यासाठी फरासखाना पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
पुणे : प्रतिनिधी
पुण्यासारख्या सांस्कृतिक व शांतताप्रिय शहराने कायमच या देशाला आणि राज्याला एक चांगली राजकीय आणि सामाजिक (BJP has tarnished Pune’s culture – Congress) संस्कृती दिली. मात्र, दुर्दैवाने याच संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम शहर भाजपने केले आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत हल्ला झाला. आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली. त्यामुळे ही घटना आणि भाजपची कृती पुण्याला काळीमा फासण्याची आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तसेच महापौर मंजुषा नागपुरे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फरासखाना पोलीृस ठाण्यासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केले.
शहर भाजप कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गान आंदोलन करण्याऐवजी हिंसक पद्धतीने आंदोलन केले. काँग्रेच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. शहराच्या संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत आमच्या कार्यकर्त्यांबरोबरच काही पत्रकार आणि पोलीस जखमी झाले आहेत. हा सर्व महापौर यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे पुण्याच्या महापौरांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेत महापौर मंजुषा नागपुरे आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना जोपर्यंत अटक करत नाही. तोपर्यंत फराखाना पोलीस ठाण्यासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह कार्यंकर्त्यांनी घेतली.
महापौर, भाजप शहराध्यक्षांना अटक करा
काँग्रेस भवन समोर वरिष्ठ पोलिस पोलिसांसमोर हे आंदोलन आणि दगडफेक झाली आहे. पुण्याच्या महापौर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी दगडफेक केली आहे, त्यांना महिलांची काळजी नाही, त्यांना महिलांची सुरक्षा महत्त्वाची नाही, त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी भाजपला अभय दिलं आहे. भाजपच्या आंदोलनकर्त्यांना संरक्षण दिलं आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलायला पोलीस आले असता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतले होते. यावेळी महापौरांना अटक करा, त्यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
दोन पत्रकार जखमी; कठोर कारवाईची पुणे पत्रकार संघाची मागणी
पुण्यात काँग्रेस भवनसमोर भाजप-काँग्रेस यांच्यात झालेल्या आंदोलनात दोन्ही बाजूने केलेल्या दगडफेकीत लोकशाहीचे रिपोर्टर चंद्रशेखर भांगे, लोकमत आॅनलाइनच्या रिर्पोटर शगुफ्ता शेख हे दोघे किरकोळ जखमी झाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिसंक आंदोलनात पत्रकार जखमी झाले आहे. याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाहीच्या गप्पा मारणाºयांनी ही दगडफेक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, कोणालाही पाठीशी घालू नये, अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने केली आहे.
कोट
भाजपने अराजकतेची आणि डोके फोडण्याची संस्कृती पुण्यात आणलेली आहे. याला पुणे शहर पोलीस देखील जबाबदार आहेत. पुण्यातील एक मुख्य रस्ता दोन तासांपासून भाजपाने अडवून ठेवलेला होता. मात्र, तरीसुद्धा पोलिसांनी त्यांना हुसकवून लावलं नाही. त्यामुळे त्यांची डेरिंग वाढली. त्यानंतर काँग्रसे कार्यालयावर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पोलिसांनी वेळीच ते सगळं थांबवलं असतं, तर असं काही झालं नसतं. आजपर्यंत कधीच आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही कार्यालयावर, दुसºया पक्षाच्या कार्यालयावर, मोर्चा नेलेला नव्हता कोणत्या नेत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला नव्हता. दुर्दैवाने आज सगळ्या गोष्टीला पोलिसांनी खतपाणी घातलं असा आमचा थेट आरोप आहे.
– प्रशांत जगताप, नगरसेवक, काँग्रेस, पुणे