पुणे, प्रतिनीधी : मेहुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिराला बारामती येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (Deera who tortured sister-in-law gets 10 years of hard labour; Baramati court verdict)अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. ही घटना १४ जून २०२४ रोजी बारामतीतील प्रगतीनगर परिसरात पीडितेच्या घरी घडली होती.याप्रकरणात पीडितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडितेचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी ते कामावर गेले असताना आरोपी पीडितेच्या घरी आला. पीडितेने त्याला चहा दिल्यानंतर काही वेळाने तो पुन्हा घरात आला. त्याने पुन्हा चहा मागितला. पीडिता स्वयंपाकघरात चहा करण्यास गेली असता आरोपी तिच्या पाठिमागे स्वयंपाक घरात गेला. तसे, तिच्यावर अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याखटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले असून त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय तपासणी अहवाल आणि पतीची साक्ष यामुळे पीडितेच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देत, पीडितेची साक्ष विश्वासार्ह असल्यास त्यावरूनही आरोपीला दोषी ठरविता येते, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.