पुणे, प्रतिनिधी : शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा स्मार्ट पद्धतीने पुणे पोलिसांना पर्दाफाश केला आहे.(Gang of mobile phone snatchers caught thanks to traffic police’s cash)न त्यांच्या ताब्यातून ८ मोबाईल फोन व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी मुंबईतून दुचाकी चोरली होती.
अर्जुन कमलेश सरोज (वय १८, रा. आंबेगाव पठार), इमरान शफीक शेख (वय १८, रा. नवी मुंबई), रविकुमार राजेंद्रकुमार (वय २१) आणि प्रदीपकुमार महेंद्रकुमार (वय २१, मूळ उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुंबईतून दुचाकी चोरी करून त्या दुचाकीवरून पुण्यात मोबाईल चोरीच्या घटना घडवल्या होत्या. पर्वती परिसरात मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान कर्मचारी प्रकाश मरगजे यांना संशयित दुचाकीची माहिती मिळाली. त्या दुचाकीची तपासणी केली असता ती मुंबईतून चोरीला गेल्याचे समोर आले. दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर ऑनलाइन दंड (चलन) टाकण्यात येत होते.
या दुचाकीवरही अनेक चलन टाकले जात होते. त्या चलनाची माहिती दुचाकीच्या मूळ मालकाच्या मोबाईलवर येत होती. पर्वती पोलिसांनी त्या माहितीचा आधार घेत संबंधित मालकाशी संपर्क ठेवत आरोपींचा माग काढला. मिळालेल्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करून चौघांच्या टोळीला जेरबंद केले.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागांतून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ८ मोबाईल फोन आणि चोरीची दुचाकी जप्त केली आहे. वाहतूक पोलिसांच्या चलन कारवाईमुळेच ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.
Traffic Police Challan
#Mobile Theft
#Pune Police Action
#Smart Pune Police