पुणे, चार वर्षांपासून प्रेम असलेल्या प्रेयसीचे अचानक लग्न जमले अन् प्रियकराला धक्काच बसला. या धक्यानंतर मात्र, चिडून प्रियकराने तिचे लग्नच मोडून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्न मोडणाऱ्या या प्रियकरावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस (Girlfriend’s arranged marriage is broken; boyfriend charged with a crime) ठाण्यात २१ वर्षीय पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून इमरान रहीमान शेख (वय २२, रा. येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि इमरान यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख होती. ओळखीनंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. तीन ते चार वर्ष त्यांच्या प्रेमसंबंध होते. पण अचानक काही महिन्यापुर्वी पिडीत मुलीचा कुटूंबियांनी दुसऱ्या मुलाशी तिचे लग्न ठरवले. नंतर पिडीत मुलीने आरोपी तरुणाला माझ्याशी कसलाच संबंध ठेवू नका, माझे लग्न जमलेले आहे, असे सांगितले. त्याचा राग आरोपी इमरान याला आला. त्याने पुर्वी असलेल्या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच, तुझे लग्न जमू देणार नाही, असे म्हणत धमकावले देखील. त्यानंतरही पिडीत तरुणी मुलाच्या या वागण्याकडे दुर्लक्षित करू लागली. त्यावेळी तरुणाने पिडीत मुलीच्या आईला लोखंडी हत्यार दाखवून त्यांना चौघांपैकी एकाला जीवेठार माण्याची धमकी दिली. तसेच, मुलीचे लग्न जमलेल्या मुलाला व त्याच्या कुटूंबियांना मुलीबाबत खोटी माहिती देऊन तिचे लग्न मोडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास लक्ष्मीनगर पोलिस करत आहेत.