– येरवडा पोलिस ठाण्यातील प्रकार
पुणे, प्रतिनिधी : लैंगिक अत्याचारप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर लॉकअपमध्ये ठेवलेल्या आरोपीने आईच्या जेवणाची आठवण (He escaped from the lockup to get his mother’s food; but, the police caught him as soon as he reached home) आल्यानंतर नामी युक्ती वापरत लॉकअपमधून पळ काढल्याची प्रकार पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात घडला. पण, घरी पोहचताच पोलिसांनी त्याला पुन्हा पकडले. लॉकअपच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून तो पसार झाला होता. रविवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याघटनेनंतर मात्र, पुणे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
elected corporators by BJP; “भाजपच्या” घाटे गुरुजींकडून नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा
शैलेश राजू मोहिते (वय२०, रा.येरवडा) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा माहितीनुसार, शैलेश याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्यामुळे येरवडा पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. गेल्या आठवड्यात शैलेशला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तो पोलिस कोठडीत होता. दरम्यान, रविवारी रात्री लॉकअपमध्ये असताना शैलेश याने चादर पाहिजे असल्याचा बहाणा केला. ड्यूटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याकडे त्याने चादर मागितली. कर्मचाऱ्याने शेजारील खोलीतून चादर आणून देणें अपेक्षित होते. पण, त्यांनी लॉकअप उघडून स्वतः घेऊन आणण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वच्छता गृहजवळील खिडकीतून पलायन केले. आरोपी लॉकअपमधून पळाल्याचे समजताच पोलिस ठाण्यासह शहर पोलिस दलात खळबळ उडाली. सर्वत्र अर्लट जारी केला. त्याचवेळी आरोपी घरी जाण्याची शक्यता असल्याने येरवडा पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचला. काही वेळानंतर शैलेश घराकडे येताच त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. शैलेश याच्यावर प्रेमप्रकरणातून हा गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.