अनुभवी की तरुण चेहरा ?
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये हालचालींना वेग आला आहे. ७३ सदस्यांच्या सभागृहात तब्बल ५१ सदस्य राष्ट्रवादीचे असल्याने (Intense competition for the post of Pune Zilla Parishad President; Read the leading names) अध्यक्षपद पक्षाकडेच जाणे निश्चित आहे. मात्र अनुभवी सदस्याला संधी द्यायची की तरुण चेहऱ्यावर विश्वास ठेवायचा, यावरून पक्षांतर्गत चर्चा रंगली आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवत जिल्ह्यावर वर्चस्व कायम राखले. इंदापूर, बारामती, मावळ आणि राजगड तालुक्यांत पक्षाने सर्व जागा जिंकल्या. दौंडसारख्या भाजप आमदार असलेल्या तालुक्यातही सातपैकी सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. आपसूकच आता निवडणूकी पार पडल्यानंतर अध्यक्ष तसेच इतर पदांसाठी पक्षाअंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीयांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे नवीन व तरूण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ही आहेत आघाडीवर नाव
दरम्यान, अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, प्रदीप वळसे पाटील, सुजाता पवार, शांताराम इंगवले, विक्रम खुटवड, करण खलाटे आदींची नावे चर्चेत आहेत. तर तरुण पिढीतून अंकिता पाटील, यशराज जगदाळे, सुनिता बुट्टे पाटील, तुषार थोरात, प्राजक्ता दुर्गाडे यांचीही दावेदारी मानली जाते. अंतिम क्षणी ‘धक्कातंत्र’ वापरले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या पश्चात पदाधिकारी निवडीत सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पक्षीय बलाबल:
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ५१
भाजप – १०
शिवसेना (ठाकरे) – ६
शिवसेना (शिंदे) – ५
राष्ट्रवादी (शरद पवार) – १
एकूण – ७३