पुणे, प्रतिनिधी : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मंदगतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे शहर (Launch of ‘Traficure’; Pune becomes the country’s first smart traffic city in collaboration with Google) वाहतूक पोलिसांनी ‘गुगल इंडिया’च्या सहकार्याने अत्याधुनिक ऑनलाइन ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली ‘ट्रॅफिक्युअर’ विकसित केली आहे. गुगल आधारित अशी प्रणाली अंमलात आणणारे पुणे हे देशातील पहिले शहर असल्याचा दावा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. लेफ्टन इंडिया आणि पुणे शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही प्रणाली साकारण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, वाहनांची मंदगती आणि अडथळ्यांची माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार आहे. अचानक कोंडी झाल्यास संबंधित पोलिसांना त्वरित अलर्ट, अपघात, रस्ते बंद, अडथळे यांची तत्काळ नोंद, वाहनांचा सरासरी वेग आणि वाहतुकीचा डेटा संकलित कोंडीची नेमकी कारणे शोधून उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
या प्रणालीचे सादरीकरण पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले की, “या सॉफ्टवेअरमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा कमी सामना करावा लागेल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि शहरातील वाहतूक अधिक गतिमान व सुरळीत होईल.”
Yerwada Jail; येरवडा कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा; सापडले ५ मोबाईल अन् पॉवर बँक
५५० हून अधिक रस्ते विभागांचे निरीक्षण
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ५५० पेक्षा अधिक विभाग तयार करून वाहतुकीचे सातत्याने निरीक्षण सुरू आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान प्रायोगिक अभ्यासात शहरातील वाहनांचा सरासरी वेग २६.८ किमी प्रतितास नोंदविण्यात आला आहे. या डेटाच्या आधारे प्रत्येक विभागातील वाहतुकीचे विश्लेषण करून कोंडी कमी करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येणार आहे.
स्मार्ट सिटीकडे आणखी एक पाऊल
या उपक्रमामुळे भविष्यात वाहतूक नियोजन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करता येणार असून, स्मार्ट सिटी संकल्पनेच्या दिशेने पुणे शहराची ही महत्त्वाची झेप ठरणार आहे. नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
license will be cancelled; पुणेकरानों ३० दिवसांत दंड भरा, अन्यथा परवाना रद्द ! पुणे पोलिसांचा इशारा