पुणे : प्रतिनिधी, राज्यातील विविध जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहिर झाला. या निकालातून भारतीय जनता पक्ष (भाजप) हाच (People have faith in Modi-Fadnavis’ leadership: Muralidhar Mohol) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे देखील आकडेवारीतून स्पष्ट झाले. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुणेकरांसह राज्यातील जनतेचा ठाम विश्वास असल्याचे सांगितले.
By-elections loom in Baramati; बारामतीत पोटनिवडणुकीची चाहूल; मतदार यादी अद्ययावत करण्यास सुरुवात
पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांमध्ये भाजपने मिळवलेले यश हे पक्षाच्या भक्कम जनाधाराचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील चालत आलेल्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत मोहोळ म्हणाले, शहराने नेहमीच आपली वेगळी राजकीय संस्कृती जपली आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रति संवेदना व्यक्त करत सर्वपक्षीय नेत्यांनी महापौर-उपमहापौर निवड बिनविरोध करण्याचा घेतलेला निर्णय हे त्याचे उदाहरण आहे.
Deputy Chief Minister Sunetra Pawar; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे व बीडच्या पालकमंत्री
पुढे ते म्हणाले, पुणेकरांनी भाजपला पुन्हा लोकसेवेची संधी दिली आहे. नगरसेवक हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून दैनंदिन प्रश्न सोडवतील. त्याचबरोबर शहराच्या पुढील शंभर वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प राबवले जातील. पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दिशेने आम्ही काम करू. महापालिका निवडणुकीतील विजय ही जबाबदारी असल्याचे सांगत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.