पुणे, प्रतिनिधी : शहर वेगाने वाढत आहे. चहूबाजूने उंचउंच इमारतीचे इमले तयार होत असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत बांधकाम देखील वेगाने वाढत आहेत. त्यामुळे या बांधकामांमुळे हवेतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिका ठोस (New regulations for RMC plants in Pune; Real-time AQI sensors on large construction sites) पावले उचलत असून, रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमधून उडणारी धूळ व सिमेंटकण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे RMC प्लांटसाठी स्वतंत्र आणि कठोर नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि उपायुक्त किशोरी शिंदे उपस्थित होत्या.
महापौर नागपुरे म्हणाल्या, “RMC प्लांटसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून लवकरच धोरण निश्चित केले जाईल. नियमावली तयार झाल्यानंतर प्रभावी कारवाई केली जाईल.” काही प्लांट राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने कारवाई होत नसल्याच्या आरोपांवर त्यांनी स्पष्ट केले की, नियम ठरल्यानंतर कठोर अंमलबजावणी केली जाईल. ५ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या बांधकाम साईट्सवर रिअल-टाइम एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) डेटा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
शहरातील ३५० बांधकाम साईट्स या पोर्टलशी जोडल्या जाणार
त्यापैकी १८० ठिकाणी सेन्सर बसविले
उर्वरित साईट्सवर पुढील एका महिन्यात सेन्सर बसविण्याचे नियोजन
नऊ मान्यताप्राप्त कंपन्यांकडून उपकरणे उपलब्ध
प्रदूषणाची नोंद थेट महापालिकेच्या डॅशबोर्डवर पाहता येणार
१८ हजार प्रकल्पांपैकी फक्त ३५० साईट्सवरच नियंत्रण?
चौकट
सध्या शहरात सुमारे १८ हजार बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी केवळ ३५० साईट्सवर सेन्सर बसविण्यात येत असल्याने उर्वरित प्रकल्पांवरील प्रदूषण नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, टप्प्याटप्प्याने सर्व मोठ्या प्रकल्पांना या यंत्रणेच्या कक्षेत आणले जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. नव्या धोरणामुळे RMC प्लांट आणि मोठ्या बांधकामांमधून होणाऱ्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.