– इतर समितींच्या पदाधिकाऱ्यांची चार दिवसांनी औपचारीक घोषणा
पुणे, महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची वर्णी लागल्यानंतर आता त्यापाठोपाठ इतर (Swarada Bapat appointed as the chairperson of the Legal Committee) विषय समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर देखील नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. विधी समितीच्या अध्यक्षपदी स्वरदा बापट यांची वर्णी लागणार आहे. तत्पुर्वी पुरेसे संख्याबळ नसणे आणि मुंबई येथील शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गेल्याने विरोधी पक्षांकडून या विषय समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले नाही. यामुळे २७ फेब्रुवारीला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर करण्याची औपचारीकता पिठासीन अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
पुणे महापालिका विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी सोमवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत अर्ज स्विकारले जाणार होते. तर २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार होती. सत्ताधारी भाजपने प्रत्येक समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर करून अर्ज ही दाखल केले. परंतु विरोधी पक्षांकडून अर्जच दाखल केले गेले नाही. त्यामुळे या समितींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडही बिनविरोधच झाल्यात जमा आहे.
महापालिकेच्या शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा आणि नाव समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्यांची नियुक्ती केली गेली आहे. यामध्ये प्रत्येक समितीवर भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती झाली आहे.
भाजपकडून समितीनिहाय अध्यक्ष अाणि उपाध्यक्ष पदासाठी संधी दिलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :
विधि समिति : अध्यक्ष – स्वरदा गौरव बापट
उपाध्यक्ष – पायल तुपे, शहर सुधारणा समिती :
अध्यक्ष – स्मिता पद्माकर वस्ते , उपाध्यक्ष – सपना आनंद छाजेड , महिला व बालकल्याण समिती :
अध्यक्ष – अल्पना गणेश वरपे, उपाध्यक्ष – तन्वी दिवेकर, क्रीडा समिती : अध्यक्ष – नारायण मोहन गलांडे, उपाध्यक्ष – दिनेश महादेव माथवड ,
शिक्षण समिती : अध्यक्ष – अरुण राजवाडे , उपाध्यक्ष – अतुल तरवडे , नाव समिती : अध्यक्ष – पल्लवी जावळे, उपाध्यक्ष – सुनील पांडे