पुणे, पुण्याच्या वेगवेगळ्या भागात घडलेल्या तीन अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका दाम्पत्याची दुचाकी स्लीप (Three accidents in Pune; Three dead) होऊन झालेल्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला. गेल्या काही वर्षात अपघातांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. उत्तमनगर, ओैंध आणि नगर रोड भागात या अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एनडीए रोडवर दुचाकी घसरुन सहप्रवासी महिलेचा शर्ली एन. अँथोनी (वय ३७, रा. वांजळे बिल्डींग, कोंढवा गेट, उत्तमनगर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात आता पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड यांनी उत्तमनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस माहितीनुसार, शर्ली आणि त्यांचे पती दुपारी भाजी मंडई परिसरातून निघाले होते. त्यावेळी एनडीए रोडवर त्यांची दुचाकी दुचाकी घसरली (स्लीप) आणि ते खाली कोसळले. यात शर्ली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक चेतन धनवडे करत आहेत.
तर, दुसरा अपघात पीएमपीचा झाला आहे. हा अपघात आौंध रोडवर घडला असून, बसने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रकला ज्ञानोबा वाव्हाळ (वय ७५ रा. इंदिरा गांधी वसाहत, ओैंध, गणेशखिंड रस्ता) असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभावती भोसले (वय ७४, रा. ओैंध) यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चंद्रकला वाव्हळ तीन दिवसांपुर्वी (दि, ३० जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास गणेशखिंड रस्त्याने निघाल्या होत्या. ओैंधमध्ये केंद्रीय विद्यालयासमोरुन त्यान रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
तर तिसरा अपघात हा नगर रोडवर झाला असून, पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने प्रवाशी रणजीत प्रकाश भोसले (वय ५१, रा. वडगाव शेरी) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत प्रवेश यादव (वय ३२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस माहितीनुसार, यादव यांचे मित्र रणजीत हे शनिवारी मध्यरात्री नगर रस्त्यावरील पीएमपी थांब्यावर थांबले होते. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेत भोसले यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीश्रक नवनाथ क्षीरसागर तपास करत आहेत.