पुणे, प्रतिनिधी : राज्यातील सर्वाधिक मोठ्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा (Three Thirteen of Yerwada Jail Security Guards; 5 Mobiles and Power Banks Found) वाजले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, हाणामारीनंतर आता कारागृहात तब्बल ५ मोबाईल तसेच पॉवर बँक सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने एकाकडे मोबाईल आढळून आल्यानंतर अचानक राबविलेल्या विशेष झडतीदरम्यान, हा साठा सापडला आहे.
याप्रकरणी नौशाद बदुद्रीन शेख याच्यासह इतर काही कैद्यांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक तुरुंगाधिकारी सुनील तुकाराम गायकवाड (५५) यांनी तक्रार दिली आहे.
license will be cancelled; पुणेकरानों ३० दिवसांत दंड भरा, अन्यथा परवाना रद्द ! पुणे पोलिसांचा इशारा
माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता गायकवाड कारागृहाच्या सर्कल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी बाह्य शौचालयाच्या मागील भागात एक संशयित व्यक्ती आढळली. त्याच्याकडे मोबाईल फोन असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. कारागृहाच्या तटबंदीच्या आत इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाईल आणि इतर साहित्य कारागृहात कोणाच्या मदतीने पोहोचले, याचा तपास आता पोलिस करत आहेत. संबंधित कैद्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, येरवडा पोलिस पुढील तपास करत आहेत.
RMC Plant Pune; पुण्यात RMC प्लांटसाठी नवी नियमावली; मोठ्या बांधकामांवर रिअल-टाइम AQI सेन्सर
विशेष झडतीत मोठा साठा जप्त
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रविवारी (दि.२२) कारागृहात विशेष झडती मोहीम राबविण्यात आली. तेव्हा बराक क्रमांक १ मधील नौशाद शेख याच्याकडून एक मोबाईल जप्त तसेच पुढील विशेष झडतीत बराक १, २ आणि ६ परिसरातून एकूण ५ मोबाईल २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आले आहेत.
हाणामारी नित्याची
येरवडा कारागृह जिल्हा कारागृह इतर कारागृहांमध्ये सातत्याने कैद्यांमध्ये हाणामारीचे प्रकार घडत आहेत. दोन गटातील वाद किंवा एकमेकांमधील तत्कालीक कारणावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.