नवी दिल्ली, प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2026 संसदेत (Union Budget 2026) सादर केला. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प (Finance Minister Nirmala Sitharaman) आहे. “देशातून गरिबी हटवण्यासाठी ठोस पावले उचलली असून, गुंतवणूक वाढली आहे. विकसित भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी प्रक्रिया सुलभ करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे सीतारामण यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? काय स्वस्त झाले आणि काय महाग? चला जाणून घेऊया सविस्तर…
पुणे–मुंबईसाठी मोठ्या घोषणा
अर्थसंकल्पात पुणे, मुंबईसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
-
पुणे–मुंबई आणि पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर उभारण्याची घोषणा
-
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारले जाणार
-
कॅन्सर व मधुमेहावरील 17 औषधे स्वस्त
आयकर आणि विम्याबाबत महत्त्वाचे बदल
-
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू
-
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट
-
अपघात विम्यातून मिळणाऱ्या रकमेवर कर लागणार नाही
-
अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद
LPG गॅस महाग की स्वस्त?
एलपीजी गॅस स्वस्त होईल, अशी अपेक्षा असताना नागरिकांना धक्का बसला आहे.
-
19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडर 49 रुपयांनी महाग
-
1 फेब्रुवारी 2026 पासून दरवाढ लागू
-
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह देशभरात दरवाढ
-
मात्र, 14 किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल नाही
खेळ, शेती आणि ग्रामीण भागासाठी दिलासा
-
‘खेलो इंडिया मिशन’ अंतर्गत खेळाडू प्रशिक्षण, प्रशिक्षक विकास आणि क्रीडा पायाभूत सुविधा
-
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीसाठी विशेष योजना
-
500 जलाशयांचा विकास
-
नारळ उत्पादनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम
काय स्वस्त झालं?
-
सौरऊर्जेशी संबंधित उत्पादने
-
चामडे व कापड निर्यात
-
शूज, बॅटरी, मायक्रोवेव्ह ओव्हन
-
संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ
काय महाग झालं?
-
खनिजे आणि भंगार
-
फ्युचर्स ट्रेडिंग
-
दारू महाग – उत्पादन शुल्क वाढल्याने तळीरामांची चिंता वाढली
सोन्या-चांदीच्या दरात दिलासा
बजेटनंतर गगनाला भिडलेल्या सोने-चांदीच्या दरात काहीशी घट झाल्याचे चित्र आहे.